
गोंदिया--तीन दिवसापूर्वी नगराध्यक्षांनी प्रसार माध्यमातून शहराचा विकास नामा सादर केला. गोंदिया नगर पालिकेचा विचार केल्यास आजही पालिका क्षेत्र समस्यांच्या विळख्यात आहे. त्यातच ५ वषार्चा अवधी लोटत चालला आहे. नगराध्यक्ष इंगळे यांनी आपल्या कार्यकाळातील एकतरी विकास सांगावा, त्यांनी जो विकासनामा सादर केला तो आपल्या कार्यकाळातील आहे. एकंदरीत नगराध्यक्ष अशोक इंगळे हे शहरवासीयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आयोजित पत्रपरिषदेत माजी नगराध्यक्ष कशीश जायस्वाल यांनी लावला आहे.
नगर पालिकेवर भाजप प्रणीत सत्ता आहे. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या कार्यकाळ बघता, शहरातील समस्या आजही आवासून उभ्या आहेत. विशेष म्हणजे शहरातील स्वच्छता व रस्ते बांधकामांचा विचार केल्यास शहर मागासलाच आहे. त्यातच तीन दिवसापूर्वी नगराध्यक्ष इंगळे यांनी विकास नाम्यातून आपण शहराचा कसा विकास केला, हा दाखविण्याचा प्रयत्न केला. दुसर्यांच्या कामांना आपल्या नावावर खपवून शहरवासीयांची फक्त दिशाभूल सुरू आहे. येत्या काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्या अनुषंगाने शहरवासीयांना भुरड घालण्यासाठी नगराध्यक्ष विकास नामाच्याचा उहापोह करीत आहे, त्यांनी जो विकासनामा प्रसार माध्यमातून प्रसिद्ध केला, त्यातील अनेक विकास कामे, सन २0१४ ऑगस्ट महिन्यापासून आपण नगराध्यक्ष असताना केले, अशी माहिती आयोजित पत्रपरिषदेत जायस्वाल यांनी दिली. या शिवाय शहरातील मोठ्या नेत्यांची काही कामे आहेत, या सर्व कामांना आपल्या विकास नाम्यात प्रसिद्धी दिली. एकंदरीत ही शहरवासीयांची शुद्ध फसवणूक आहे. त्यांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी ही आयोजित पत्र परिषदेत माजी नगराध्यक्ष कशीश जायस्वाल यांनी केली आहे.