किरीट सोमय्या यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक

0
60

वाशीम–भाजप नेते किरीट सोमय्या हे वाशीम जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांच्या ताफ्यातील वाहनांवर शिवसैनिकांनी दगडफेक व शाई फेक केल्याची घटना घडली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर घोटाळ्याचे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.
त्या अनुषंगाने त्यांनी आज वाशीमचा दौरा आखला आहे. दरम्यान खासदार गवळी यांच्या संस्थेच्या कारखान्याची पाहणी करण्याकरिता सोमय्या आले होते. त्यावेळी खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी सोमय्यांच्या वाहनाच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवित त्यांचा निषेध नोंदविला. त्याचवेळेस त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर दगडफेक झाली पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठी हल्ला केल्याचे समजते.