प्रदेश काँग्रेस कार्यकारीणीत सचिवपदी गोंदिया जिल्ह्यातून पी.जी.कटरेंचा समावेश

0
227

गोंदिया,दि.27ः- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची अखेर जम्बो कार्यकारीणी जाहीर झाली असून अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंच्या टीमची घोषणा केली आहे. रात्री उशिरा नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत 18 उपाध्यक्ष, 1 खजिनदार, 65 सरचिटणीस, 104 चिटणीस आणि 6 प्रवक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातून जिल्हा परिषदेचे माजी सभापती व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पी.जी.कटरे यांची प्रदेश कार्यकारीणीवर चिटणीस(सचिव)म्हणून निवड करण्यात आली आहे.आपल्या निवडीचे श्रेय पी.जी.कटरे यांनी प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोलेसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिले आहे.