शुक्रवारला केंद्रसरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
31

गोंदिया,दि.25ः-जिल्हयात या वर्षीच्या उन्हाळी हंगामातील सुमारे 68 हजार हेक्टर शेतजमिनीवर उन्हाळी धानाची लागवड केली आहे. मागील वर्षी २२ लाख क्विंटल उन्हाळी धान खरेदी झाली होती. त्यानुसार यावर्षी राज्य शासनाने केद्र शासनाकडे सुमारे 30 लाख क्विंटल धान खरेदीची परवानगी मागितली.पण केंद्र शासनाने फक्त 11 लाख क्विंटलची संपूर्ण राज्यासाठी परवानगी दिली.त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे एकरी 8 क्विंटल धान विकता येईल.राष्ट्रवादी काँग्रेसने सुरवातीपासूनच हि मर्यादा वाढवून दयावे म्हणून खासदार प्रफुल पटेल यांचेमार्फत प्रयत्न सुरु केले असून केंद्र शासनाने अद्यापही मर्यादा वाढवून दिली नाही.यामुळे शेतकऱ्यांचा धान निघाल्या पासून शेतकऱ्यांच्या समोर अडचण निर्माण झाली आहे.तसेच पेट्रोल, डिझेल व सिलेंडर गॅसच्या किंमतीत वाढ यामुळेही सामान्य माणूस अडचणीत आला आहे.केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 27 मे रोज शुक्रवारला दुपारी 01.00 वाजता माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात जिल्हा मुख्यालयात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या धरणे आंदोलनाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता व शेतकरी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र भगत यांनी केले आहे.