२०० हून अधिक संस्था व संघटनातर्पेâ नागरी सत्कार
गोंदिया : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याशी आपल कौटुंबिक नाते आहे. दोन्ही जिल्ह्यात राजकीय व सामाजिक कामे करताना अनेक चढ-उताराला समोर जावे लागले. मात्र, या जिल्ह्यातूनच मला प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. मी कितीही शिकरावर असलो तरी माझ्या जीवन प्रवासात दोन्ही जिल्ह्याचा सांभाळ खांद्यावर आहे. हे कधीही स्मरणात राहते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याचा सांभाळ जीवन प्रवासाचे गमक आहे, अशी स्पष्टोक्ती खा.प्रफुल पटेल यांनी केली.
राज्यसभेवर पुन्हा निर्वाचित झाल्यानंतर खा.प्रफुल पटेल या आज (ता.११) गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौर्यावर होते. यानिमित्त स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या आडोटोरियम येथे २०० हून अधिक संस्था व संघटनातर्पेâ आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. खा.पटेल पुढे म्हणाले, माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाचा प्रवास फार लांब ठरला आहे. मागील ३२ वर्षांपासून लोकसभा व राज्यसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे सर्वात मोठे दायित्व माझ्या खांद्यावर आहे, हे मी कधीही विसरणार नाही. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव झटत राहणार, मी आज ज्या स्तरावर कार्य करतो. या मागे स्व.मनोहरभाई पटेल यांचा आशिर्वादच आहे. त्याचबरोबर गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेचे प्रेम माझ्या पाठीशी आहे. जनतेचे काम प्रत्येक जनप्रतिनिधीने करायला पाहिजे. त्या मोबदल्यात जनताही केलेल्या कामाचे स्मरण करीत असते. हे मला स्व.मनोहरभाई पटेल यांच्या अंतिम दर्शनासाठी जमलेल्या जनतेच्या डोळ्यातील अश्रु आठवण करून देतात. मी गोंदिया जिल्ह्याचा विकासासाठी कसलेही राजकारण आडकाठी येवू देत नाही. आणि आगामी काळातही गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या पाठीशी उभे राहणार आहे. मी कुठेही राहत असलो मात्र मुळचा पत्ता रामनगर गोंदिया हाच दर्शविला जातो. त्यामुळे गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे माझे कुटूंब आहेत. अशीही ग्वाही खा.पटेल यांनी दिली.
यावेळी मंचावर खा.प्रफुल पटेल, आ.विनोद अग्रवाल, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ.राजु कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, अनिल बावणकर, शिवसेनेचे मुकेश शिवहरे, राजु कुथे, दामोदर अग्रवाल, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी २०० हून अधिक संघटना व संस्थांकडून खा.प्रफुल पटेल यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी गोंदिया शहरात खा.प्रफुल पटेल यांचे आगमन होताच राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून स्वागत केले.
सत्कार करणार्या संघटना व संस्था
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राईस मिलर्स असोसिएशन, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया, जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ, संपादक संघ, लघु वृत्तपत्र संघ, गौरक्षण समिती, अग्रेसन समिती यासह २०० संघटना व संस्थांचा समावेश होता.
००००००