
कोरोना काळात कार्यरत प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
देवरी,दि.17- गेल्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन देवरी येथे करण्यात आले होते.
स्थानिक क्रीडा संकूलात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचे अध्यक्षतेखाली म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी रमेश ताराम, सत्कारमुर्ती म्हणून गोंदिया जि.प.चे उपाध्यक्ष इंजी. यशंवत गणवीर, तहसीलदार अनिल पवार, देवरीचे ठाणेदार रेवचंद सिगंनजुडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय पाटनकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंद गजभिये, समाज प्रबोधनकार निखिल बन्सोड आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीच्या वतीने क्रीडासंकुल,नगरपंचायत पटांगण या ठिकाणी आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, कोरोना काळात कार्य करनारे डॉक्टर्स , आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी,सामाजिक क्षेत्रात काम करनाऱ्या नागरिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छोटेलाल बिसेन यांनी केले. संचालन मुकेश खरोले यांनी तर उपस्थितांचे आभार मनोहर राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.