एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी:एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी शिदें म्हणाले – आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक

0
16

मुंबई-एकनाथ शिंदे सुरतमध्ये गेल्यापासून राज्यातील राजकीय घटनांनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

अजय चौधरी शिवसेनेचे नवे गटनेते

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावर वर्णी​​​​​​​ लागली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांच्यासोबत अनेक आमदार आणि नेते पक्ष सोडू शकतात. असा दावा अनेक राजकीय अभ्यासक करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या बैठकीला केवळ 18 आमदार उपस्थित असल्याने इतर आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.