
गोंदिया,दि.28- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी 01.30 वाजता मुकेश शिवहरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, दुपारी 02 वाजता बाईक रॅलीस उपस्थिती स्थळ सिटी पोलीस स्टेशनच्या बाजूला बालाघाट टी पॉईंट, 02.15 जयस्तंभ चौक येथे आगमन व कार्यकर्त्यांच्या भेटी, 02.30 अग्रसेन भवन येथे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिरास भेट, 02.45 हिंदू गर्जना मेळावा कार्यक्रमास उपस्थिती, 04.30 गोंदिया जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांसमवेत चर्चा स्थळ शासकीय विश्रामगृह, सायंकाळी 05.30 वाजता शिवसेना फलक कार्यक्रमास उपस्थिती फुलचुर नाका व सायंकाळी 06 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, 07 वाजता मनोहर चौक येथे शारदा उत्सव समिती महाआरतीस उपस्थिती व सोईनुसार शासकिय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम.