धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात प्रतिपादन
अकोला-लवकरच महागाई थांबली नाही तर येणाऱ्या काळात आर्थिक संकट अटळ असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी दसऱ्यानिमित्त आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.
खरंतर सरकार कसे चालवायचे हेच सत्याधारांना कळत नसल्याने देशात प्रचंड महागाई वाढली आहे. रुपयाची किंमत कमी झाली आहे. जीवनावश्यक वस्तू सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत. पेट्रोल डिझेल सह अगदी गॅस सिलेंडरचे दरही अव्वाच्या सव्वा वाढले आहे. ही महागाई लवकरच नियंत्रणात आणली नाही तर देशावर आर्थिक संकट कोसळेल आणि त्याला सत्ताधारी जबाबदार असतील. सध्याच्या राजकीय वातावरणात देशात हुकूमशाही आणि अराजकता खोपावत असल्याच्या परिस्थितीत जर लोकशाही टिकवायची असेल तर आपण सर्वांनी एकजूट होऊन लढले पाहिजे असेही आव्हान उपस्थित प्रचंड जम्मू जनसमुदायाला एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले.
हे सरकार कोणाचेही ऐकून घ्यायच्या तयारीत नसल्याने आता आपल्यालाच एकजूट होऊन हे कार्य करावे लागणार आहे.
मागील 38 वर्षापासून अकोला शहरात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन केल्या जाते. अगदी छोटे खाणी सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाला आता लाखोच्या संख्येने अनुयायी उपस्थित असतात. दूर दूर वरून बौद्ध बांधव अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकायला एकच गर्दी करतात. दुपारी एक वाजता स्थानिक रेल्वे स्टेशन चौकातून एक भव्य रॅली द्वारे प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सोबतच्या नेत्यांची मिरवणूक काढण्यात आली शिवाजी कॉलेज, सिटी कोतवाली चौक, गांधी मार्ग, बस स्टॅन्ड चौक, असं मार्गक्रमण करत ही रॅली क्रिकेट क्लब मैदानात पोचली जिथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
काल अकोल्यात प्रचंड पाऊस झाला पावसाच्या या तडाख्यानंतरही कुठलेही अनुयायी जागचे हल्ले नाहीत. प्रचंड गर्दीत बाळासाहेबांना ऐकायसाठी ते उत्सुक होते. रात्री उशिरापर्यंत चाललेली ही सभा प्रत्येक भीमसैनिक कानात जीव ओतून ऐकत होता.
आता सरपंच पदासाठी
यापूर्वी सरपंच पदासाठी वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करत नव्हती. मात्र यापुढे प्रत्येक गावागावात वंचित चे सरपंच असले पाहिजे असे आवाहन खेडेगावातून आलेल्या तमाम जनसमुदायाला प्रकाश आंबेडकरांनी केल्यावर एकच जल्लोष झाला.
प्रचंड पावसातही तोच उत्साह
प्रचंड पाऊस सुरू असतानाही आंबेडकरांना ऐकायला आलेला जनसमुदाय जिथल्या तिथे उभा होता. एक लाखाच्या आसपास गर्दी प्रकाश आंबेडकरांना ऐकण्यासाठी दरवर्षी होते. यंदा पहिल्यांदाच या सभेत पाऊस आल्याने गोंधळ उडेल अशी भीती असतानाही अगदी शांततेत आंबेडकरांना रात्री उशिरापर्यंत लोकांनी ऐकून घेतलं.