
गोंदिया : धानाला 1000 रुपये बोनस, महागाई, शेतकरी, शेतमजूर, तसेच जिल्ह्यातील विविध समस्यांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी दुपारी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात येणार आहे. माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष परशुरामकर तसेच सर्व आघाड्यांच्या पदाधिकार्यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे.
शेतकर्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे बोनस प्रतिक्विंटल 1000 रूपये देण्यात यावे, धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी त्वरित सुरू करण्यात यावी, जमिनीचे पट्टे त्वरित देण्यात यावे, ज्या शेतकर्यांना पट्टे मिळाले आहेत. त्या शेतकर्यांचा सातबारावर पिक नोंदणी करण्यात यावी, आगामी काळात मुदत संपणार्या ग्राम पंचायतीच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्या, तांदूळ वर लावलेले निर्यात कर त्वरित मागे घेण्यात यावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून त्वरित मोबदला देण्यात यावा, वन्यप्राण्यांमुळे झालेले पिकांचे नुकसान व मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबाना आर्थिक मदत करण्यात यावी आदि मागण्यांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष परशुरामकर तसेच सर्व आघाड्यांच्या पदाधिकार्यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.