
मुंबई :-मुलायम सिंह यादव अर्थात नेताजी… उत्तर प्रदेशच्या राजकारणातील महत्वाचा नेता… सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलायम सिंह यांनी कधीकाळी पैलवान होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.तेच नेताजी आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पुढे जाऊन देशाचे संरक्षण मंत्री झाले. यूपीसह देशाच्या राजकारणातही त्यांचं स्थान अढळ राहिलं.
👉🛑👉1939 ला उत्तर प्रदेशमधल्या इटावा जिल्ह्यातील सैफई या गावात मुलायम सिंह यांचा जन्म झाला. त्याचे वडील सुघर सिंह आणि आई मारुतीदेवी हे दोघेही शेती करायचे.सुघर सिंह यांची इच्छा होती की मुलायम सिंह यांनी पैलवान व्हावं.त्यासाठी त्यांना तसं प्रशिक्षणही देण्यात आलं. स्वत: मुलायम सिंह यांनाही कुस्तीची आवड होती. कुस्तीत आपल्या डावपेचामुळे प्रतिस्पर्ध्याला चितपट करायचे. याच डावपेचाचा त्यांनी राजकारणातही उपयोग केला आणि तीनदा उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं.
👉🟥👉राम मनोहर लोहिया यांनी नहर रेट आंदोलनाची घोषणा केली. यात मुलायम सिंहही सहभागी झाले. या आंदोलना दरम्यान लोहिया यांच्यासरह काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. यात मुलायम सिंहदेखील होते. यावेळी त्यांचं वय अवघं 15 वर्षे होतं. तेव्हापासून लोहिया आणि त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. तिथून पुढे ते कायम राहिले.
👉🅾️👉मुलायम सिंह आठवेळा आमदार म्हणून निवडून आले. 1989 ला मुलायम सिंह पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 1993 ला ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर 2003 ला तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.
मुलायम सिंह यादव यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भावूक ट्विट,म्हणाले.
I had many interactions with Mulayam Singh Yadav Ji when we served as Chief Ministers of our respective states. The close association continued and I always looked forward to hearing his views. His demise pains me. Condolences to his family and lakhs of supporters. Om Shanti. pic.twitter.com/eWbJYoNfzU
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2022
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. मुलायमसिंग गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात होते प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.रविवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर सपा कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
👉🔴👉पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या निधनाने मला दुःख होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर मुलायम सिंह यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, श्री मुलायम सिंह यादवजी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्यांप्रती संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी तत्परतेने लोकांची सेवा केली.
👉🟥👉मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःच वेगळे स्थान निर्माण केले. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीचे प्रमुख सैनिक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी सशक्त भारतासाठी काम केले अशा प्रकारच्या आठवणी यावेळी पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.