
तिरोडा – स्थित रमपूज्य सिंधी सभागृह, सिंधी कॉलोनी येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी पटेल यांच्या सोबत नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणूक व अन्य विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, तिरोडा येथे अदानी पॉवर प्लांटच्या निर्मिती मुळे परिसरातील लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. तिरोडा शहर व परिसरातील गावांचा केंद्रीय सार्वजनिक उपक्रम सामाजिक दायित्व (CSR ) योजनेंतर्गत विकासाला चालना मिळाली आहे. धापेवाडा व कवलेवाडा पाटबंधारे प्रकल्पातून हजारो हेक्टर शेतीला सिंचन झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती मधून विविध पिके व उत्पादन क्षमतेत वाढ करता आली आहे. त्याचबरोबर कवलेवडा टप्पा २ चे काम विद्यमान सरकारने लवकर सुरू करावे ही आमची मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना बोनस देण्याचा आश्वासन दिला होता आणि त्याप्रमाणे शेतकर्यांना धानाचा बोनस मिळाला, यावर्षीही शेतकर्यांना 1000 रुपये बोनस मिळावा व प्रति एकरी 20 क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी. अशी मागणी विद्यमान सरकारकडे केली आहे. आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि पुढेही राहू यात कोणतीही शंका न ठेवता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे कामे करावीत असे प्रतिपादन खा.प्रफुल पटेल यांनी केले.
खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, सौ. राजलक्ष्मी तुरकर, भोजलाल धामेचा, प्रेमकुमार रहांगडाले, अविनाश जयस्वाल, योगेंद्र भगत, विशाल शेंडे, रफिक खान, जिब्राईल पठाण, नरेश कुंभारे, रविकांत बोपचे, अजय गौर, प्रभू असाठी, रामकुमार असाठी, राजेश गुन्हेरिया, जगदीश बावणथळे, डॉ.संदीप मेश्राम, ममता बैस, प्रशांत डहाट, जगदीश कटरे, ममता हट्टेवार, विजय बुराडे, नासिर घानीवाला, राहुल गहेरवार, बबलू ठाकूर, राजेश श्रीरामे, दिनेश वैद्य, इंदू हिरापुरे, संतोष मेश्राम, इम्तेहान शेख, रामाजी ऊके, देविदास जोशी महाराज, नेहा तरारे, दीपक जयस्वाल, योगिता कावळे, भरत मलेवार, इकबाल भाई शेख, नागेश तरारे, प्रकाश ज्ञानचंदानी, बालू येरपुडे, महेश आरेवाणी, भाग्यश्री केडवतकर, वनमाला डहाके , सुकाजी चौधरी, वंदना चव्हाण, मुन्ना बिझाडे, धर्मेंद्र चौधरी, रफिक शेख, नितीन लारोकर, मुकेश बरईकर, अल्केश मिश्रा, किरण बनसोड, भूपेंद्र पटले, भवानीसिंग बैस, मनोहर तरारे, गोपीचंद कावडे, मयाराम सोनेवाने, दिलीप बोरघरे, विकास निखुडे, निर्मलाबाई मुळे सहित तिरोडा तालुका व शहर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
तिरोडा येथील या कार्यक्रम प्रसंगी शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी लढणारे खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मुंडीकोटा येथील धरम शेंडे, नागेश शेंडे, वनिला उके, दिलीप कामडे,गुरु शेंडे, सोनू कामडे यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. श्री पटेल यांनी सर्व प्रवेशित कार्यकर्त्यांचा पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले.