राज्यपाल हटवा,महाराष्ट्र वाचवा विरोधी पक्षांचे पायर्यावर आंदोलन

0
13

नागपूर,दि.22 : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या विरोधातील वातावरण निवळण्याची चिन्हे नाहीत. आता हे लोण महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनातही पोचले असून आज 22 डिसेंबरला नागपूर येथील विधानभवनाच्या पायर्यावर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणाबाजी करीत राज्यपाल हटवा,महाराष्ट्र वाचवाचा थेड नारा दिला आहे.या आंदोलनात विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,छगन भुजबळ,राजेश टोपे,सुनिल केदार,रोहीत पवार,विकास ठाकरे,नितिन राऊत आदी आमदार सहभागी झाले होते.

यापुर्वी नाशिक जिल्ह्यातील जाखोरी या गावाने बैठक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवा असा ठराव केला. असा ठराव करणारे हे राज्यातील पहिले गाव असु शकतेे. (Jakhori is the first village passed resolution against Governer)