गेवर्धा फाट्यावर कृषी पंप धारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन

0
82

कुरखेडा- तालुक्यातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे गेवर्धा फाट्यावर जवळपास दिड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेवराव किरसान, तालुका अध्यक्ष जीवन पाटिल नाट, माजी कुरखेडा तालुका अध्यक्ष जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष परसराम टिकले, देसाईगंज तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुले, जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेस चे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामन सावसागडे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गिरीधर तितराम, नंदु नरोटे, पिंकू बावणे, यासह गेवर्धा, चिखली, वडेगाव, गुरुनोली परीसरातील कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.