चहापानावर काँग्रेसचा बहिष्कार

0
11

नागपूर-उपराजधानीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या सत्ता पक्षाच्या चहापानावर काँग्रेस बहिष्कार टाकणार असल्याचे काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यात परिवर्तन होऊन भाजप-सेना सरकार सत्तेवर आल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्तापक्षाकडून चहापान आयोजित करण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ असताना राज्य सरकारने त्यांच्यासाठी पॅकेज घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली. एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना काँग्रेसने चहापानाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप-शिवसेना सत्तेत असल्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तापक्षाला जाब विचारणार आहे.