Home राजकीय देवरीत काँग्रेसच्यावतीने मुक मोर्चा;आमगाव गोरेगावतही काँग्रेसचा बंद

देवरीत काँग्रेसच्यावतीने मुक मोर्चा;आमगाव गोरेगावतही काँग्रेसचा बंद

0

देवरी : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा महासचिव सहषरा‘ कोरोटे यांच्या नेतृत्वात शहरात मुक‘मोर्चा काढण्यात आला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. आमदार अग्रवाल यांच्यावर हल्ला करणारा आरोपी शिव शर्मा याला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी प्रभारी तहसीलदार मंहेंद्र सूर्यवंशी यांच्या माफेर्त मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली. मोर्चात माजी आमदार रामरतन राऊत, तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, माधुरी कुंभरे, पंचायत समितीच्या उपसभापती संगिता भेलावे, माजी जि. प. सदस्य संदीप भाटीया, अ‍ॅड. प्रशांत संगीडवार, दिलीप संगीडवार जैपाल शहारे, ओमराज बहेकार, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, छगनलाल मुंगनकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमगाव गोरेगावतही काँग्रेसचा बंद
आंमगाव : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमगाव बंदचे आवाहन करण्यात आले. स्थानिक गांधी चौकात निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर शिव शर्मा यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. निषेध सभेला काँग्रेस नेते धिरेश पटेल, सुरेंद्र मिश्रा, केशरीचंद सेठीया, रामसिह चव्हाण, इसूलाल भालेकर, राजकुमार फुंडे, राजा मिश्रा, राधाकिसन चुटे, दिगंबर कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीनेही बंद पाडण्यात आला तालुका अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले ,नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात गोरेगाव बंद करण्यात आले.

Exit mobile version