Home विदर्भ काँग्रेसच्यावतीने आयोजित शहर बंदला प्रतिसाद,पोलीस ठाण्याचा घेराव

काँग्रेसच्यावतीने आयोजित शहर बंदला प्रतिसाद,पोलीस ठाण्याचा घेराव

0

गोंदिया :येथील काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ  आज रविवारी (ता. १०) जिल्ह्यातील पाच तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात हा बंद पुकारण्यात आला. गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सालेकसा व देवरी येथे १०० टक्के व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.त्यातच  पोलिसांनी नगरसेवक शिव शर्मा यांच्या तपासासाठी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदिप पखाले यांच्या नेतृत्वात सहा शोधपथक रवाना करण्यात आले. दरम्यान गोपालदास अग्रवाल यांच्या समर्थकांनी शिव शर्मा यांचे घर आणि नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
आमदार अग्रवाल यांच्यावर जिवघेणा हल्ला करणाèया शिव शर्मा यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत काँग्रेस कमिटीच्या कार्यकत्र्यांनी आज, रविवारी शहरात बंद पाळला. सकाळी १० च्या सुमारास रॅली काढून व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार शहरातील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. काँग्रेस कार्यकत्र्यांनी एसटी बसेसही रोखून धरल्या होत्या. त्यामुळे जवळपास पाऊणतास एसटी बसेसच्या संपूर्ण फेर्या बंद ठेवण्यात आल्या. पेट्रोलपंपही बंद करण्यात आले. कार्यकत्र्यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन घटनेचा निषेध केला. या प्रकरणातील आरोपी नगरसेवक शिव शर्मा यांच्या घरावर अज्ञात ४० ते ५० जणांनी हल्ला करून वाहनांची तोडफोड केली. त्याचबरोबर नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या कार्यालयाची देखील तोडङ्कोड केली. शहरात अनेक वाहन आणि दुकानांवर देखील दगडङ्केक करण्यात आली. कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version