जल्लोष विजयाचा!! देवरीत कॉंग्रेसची आतिषबाजी.

0
14

देवरी,ता.१४: कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत कांग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळविले. या विजयाचा जल्लोष शनिवारी (दि.१३ ) सायंकाळी देवरी तालुका कांग्रेस पक्षाच्या वतीने राणी दुर्गावती चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा करण्यात आला.

देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात कर्नाटक राज्यातील कॉंग्रेस पत्राला मिळालेले प्रचंड यशाचा जल्लोष मिठाई वाटून मोठा विजयाचा करण्यात आला..
यावेळी कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी राहुल गांधी आगे बढो,हम तुम्हारे साथ है. प्रियंका गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है. सोनिया गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है. कोरोटे साहाब आगे बढो,हम तुम्हारे साथ है. कांग्रेस पार्टी जिंदाबाद अशा घोषणा देत हा विजयोत्सव साजरा केला. या जल्लोषात आमदार कोरोटे यांच्यासह कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडिया, देवरी शहराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, देवरीचे नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया,नितीन मेश्राम, शकील कुरैशी, दीपक (राजा) भाटिया, कुलदिप गुप्ता, जैपाल शहारे,बळीराम कोटवार, नमन गुप्ता, अमित तरजुले, सुरेन्द्र बन्सोड, राजेश गहाणे , अरविंद उके यांच्यासोबत तालुक्यातील सर्व आजी माजी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.