गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्षपदी एड.येशुलाल उपराडेंची नियुक्ती

0
40

गोंदिया,दि.19ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या 2023 या वर्षाच्या कार्यकाळाकरीता नवीन जिल्हाध्यक्षाच्या नियुक्त्या जाहीर केल्या.यामध्ये गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर आमगाव निवासी एड.येशुलाल उपराडे यांची नियुक्ती केली आहे.विशेष म्हणजे आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंंघात सलग दुसर्यांदा जिल्हाध्यक्षपदाचा मान गेला आहे.जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये अनेक नावे चर्चेत होती,मात्र प्रदेशाध्यक्षांनी नाव निवडतांना नवा चेहरा समोर आणल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.तर भंडारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी प्रकाश बाळबुध्दे यांची निवड केली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष निवडतांना भाजपने विधानसभा व लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील जातीय समीकरणाचे गणित लक्षात घेत आणि सर्वाना प्रतिनिधीत्व मिळावे हे राजकीय गणित समोर ठेवल्याचे दिसून येत आहे.