29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ सुशिक्षित पात्रताधारकांना सेवेची संधी द्या-सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची मागणी

सुशिक्षित पात्रताधारकांना सेवेची संधी द्या-सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची मागणी

0
20

blank

सडक अर्जुनी,दि.19- नुकताच शासनाने सेवानिवृत शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय निर्गमीत केला आहे.हा निर्णय चुकीचा आहे. सदर निर्णय रद्द करून सुशिक्षित पात्रताधारकांना सेवेची संधी देण्याबाबतचे निवेदन शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटना तालुका सडक अर्जुनी च्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना १८ जुलैला पाठविण्यात आले आहे.

सध्या बी.ए., एम.ए. शैक्षणिक पदवी व डी.एड., बी.एड. एम. एड., पी.एच.डी. व्यावसायिक पदवी असलेले सुशिक्षित पात्रताधारक नोकरी साठी प्रयत्न करीत आहेत. सध्या सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या वाढत असून पालक व समाजाकरिता ही चिंतेची बाब झाली आहे. यावर शासनाने उपाय न काढता सेवानिवृत्त शिक्षकांना कामी लावण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे एक समस्या निर्माण झाली आहे. सदर निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. सदर निर्णय रद्द करून सुशिक्षित पात्रता धारकांना सेवेची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.तसे निवेदन मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री
यांना पाठविण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार प्रेरणा कटरे यांना देण्यात आले . निवेदन देतांना शासकीय व निमशासकीय सेवानिवृत संघटनेचे भाऊराव यावलकर, आर.व्ही.मेश्राम, मदनलाल चूऱ्हे , दिलीप राऊत, एम. यू. गहाणे, व्ही. एस. गजभिये, हिरालाल राऊत, डॉ. पी.पी.मारगाये, के.पी. उपरीकर आदी उपस्थित होते.

blank