मंत्र्यांनो, संपत्ती जाहीर करा:भाजपचे फर्मान

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व खासदार व मंत्र्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील बुधवारपर्यंत जाहीर करावा, असे निर्देश पक्षातर्फे आज (मंगळवार) देण्यात आले. भाजपच्या संसदीय मंडळामध्ये या महत्त्वपूर्ण विषयावर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी इतरही संवेदनशील विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेला सुशसनाचा सुवर्णकाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे नेत असल्याचे मत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी व्यक्त केले. याचबरोबर पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांविरोधात वापरलेल्या अशोभनीय भाषेचाही भाजपतर्फे निषेध नोंदविण्यात आला. बॅनर्जी यांचे नैराश्‍य या स्वरुपाच्या भाषेमधून दिसून येत असल्याची टीका भाजपने यावेळी केली.