गोरेगाव :-गोरेगाव तालुका अत्यंत मागासलेला तालुका आहे या तालुक्यात मुख्यतः धानपिक घेतली जाते खरीप पिकाशिवाय दुसरे पीक या तालुक्यात अल्प प्रमाणात आहे .कधी ओला दुष्काळ तर कधी किडीचा प्रादुर्भाव त्यामुळे पिकाचे झालेले नुकसान/उर्वरक/कीटकनाशक /मजुरीचे वाढलेले भाव सध्या धान उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारे नाही .त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आलेला आहे. त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार शासनाच्या नोकर भरतीच्या ध्येय धोरणामुळे खूप अडचणीत आलेला आहे. अशा विविध मागण्यांना घेऊन2 नोव्हेंबर रोजी गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री शासन यांच्या नावे तहसीलदार के.के.भदाने यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.निवेदनात तालुक्याला सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांचे धान विक्रीसाठी शासकीय आधारभूत दान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धनाची चुकारे विलंब न करता त्वरित देण्यात यावे, शासकीय आधारभूत धान खरेदीचे लागू केलेले नियम व अटी शर्ती रद्द करण्यात यावे, धान खरेदी केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०००-/ रुपये प्रमाणे बोनस देण्यात यावा, धानाला उत्पादन खर्चा प्रमाणे 3000-/ तिनहजार रुपये प्रतिक्विंटल शासकीय आधारभूत हमीभाव देण्यात यावा ,शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे जंगली जनावरापासून होणाऱ्या नुकसानीचा पीक विमा लागू करून त्वरित मिळण्यात यावा ,शेतकऱ्यांची पीक कर्जाची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ,शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज बिल माफ करण्यात यावे ,घरगुती विद्युत बिल चे प्रति युनिट दर कमी करून वाढलेले विद्युत बिल कमी करण्यात यावे ,शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाचा विद्युत प्रवाह ८तास मिळत असून १६तास कटोती राहते त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे .करीता शेतकऱ्याला 2४तास विद्युत प्रवाह देऊन कटोती बंद करण्यात यावी ,पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहे ते कमी करण्यात यावे, जीवनाशक वस्तू दूध दही तेल ,शालेय साहित्य व शेती साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून बी बियाणे खताचे वाढलेले किमती कमी करण्यात यावे,सुक्षीत बेरोजगारांना शाशकीय नौकर भर्तीची कंत्राटी पध्दत बंद करुन सरळ सेवा भरती करुन नियमीत करण्यात यावे,सुशीक्षीत बेरोजगांराकडुन नौकर भरती आवेदन शुल्क कमी आकारुन भरती प्रक्रीया शाशकीय यंत्रणेद्वारे करण्यत यावी,राज्यात जातीनिहाय जनगणणा करण्यात यावीया व्यतिरिक्त अनेक मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
निवेदन देतेवेळी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड,गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले,खरेदी विक्री समितीचे सभापती जगदीश येरोला,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मलेशाम येरोला,महीला काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदादेवी कटरे,सविता फुंडे,महिला काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्ष भुमेश्वरी राहागंडाले,अशोक शेंडे ,बिनराज मेश्राम, जितेंद्र डोंगरे, महाप्रकाश बिजेवार, मनोहर मोजे ,प्रशांत कटरे ,गणराज कुमळे, मदन कोंटगले,भूषण बिसेन,लाखन बोरकर ,आबीदपठाण ,उत्तम कटरे, शोभेलालबोपचे ,ज्ञानेश्वर कटरे, चौकलाल वाढवे ,स्नेहा कोल्हे ,आरती चवारे,यादोराव पारधी, हेतराम धमगाये, भीमराज टेंभुर्णीकर ,रुपेंद्र दिहारे, कविता लिचळे, अरुण बिसेन,राजेश टेभरे, रमेश राहागंडाले, प्रेमेन्द्र कटरे आदी काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.