ग्रा.पं. संगणक आपरेटरांना मिळणार १९ महिन्याचे अतिरिक्त वेतन

0
153

आमदार कोरोटे यांचे प्रयत्न यशस्वी
■ राज्य शासनाचा १० जानेवारी २०२४ रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्याचा आदेश.

देवरी,दि. 11 : ग्रामपंचायती मध्ये काम करणारे संघणक कर्मचारी यांचे वेतन अनेक महिन्यापासून थकित होते. हा मुद्दा आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडला होता या मुद्दाची दखल घेत शासनाने उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि.१०.०८.२०२० रोजीच्या अधिसूचनेस अनुसरून दि.०१.०९.२०२० ते दि.३१.०३.२०२२ या 19 महिन्यांचा सुधारीत किमान देतनातील फरकाची रक्कम ग्रामपंचायत संघणक कर्मचान्यांना प्रदान करण्यास मंजूरी दिली आहे.असा राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाचा निर्णय हा तारीख १० जानेवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.या निर्णयामुळे ग्रा.पं.च्या कर्मचा-यांनी आमदार कोरोटे यांचे केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन करून आभार मानले आहे.
सविस्तर असे की दि.०१/०९/२०२० ते दि.३१/०३/२०२२ पर्यंतच्या ग्रामपंचायत कर्मचा-यांचे सुधारीत किमान वेतनातील थकबाकी रक्कम देण्याबाबत ग्रा.पं. कर्मचा-यांच्या विविध संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. परंतू त्यांना न्याय मिळाला नव्हता. ही माहिमी आमदार सहषराम कोरोटे यांना मिळताच त्यांनी हा मुद्दा नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात मांडला.या मुद्दाची दखल घेत शासनाने उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या दि.१०.०८.२०२० रोजीच्या अधिसूचनेस अनुसरून दि.०१.०९.२०२० ते दि.३१.०३.२०२२ या १९ महिन्यांचा सुधारीत किमान देतनातील फरकाची अतिरिक्त (थकित) रक्कम ग्रामपंचायत संघणक कर्मचा-यांना प्रदान करण्यास मंजूरी दिली आहे.
असा राज्य शासनाचा ग्राम विकास विभागाचा निर्णय हा तारीख १० जानेवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.या निर्णयामुळे ग्रा.पं. कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या कर्मचा-यांनी आमदा कोरोटे यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने त्यांना न्याय मिळाल्यामुळे या कर्मचा-यांनी आमदार कोरोटे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे.