Home राजकीय देशाचा चौकीदार हा वोट चोर अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसने केला सुप्रीम कोर्टाच्या...

देशाचा चौकीदार हा वोट चोर अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसने केला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा स्वागत

0

भाजपा सत्तेसाठी व आपल्या व्यापारी मित्रांसाठी प्रत्येक क्षेत्रात संविधानाचा अपमान करते – इंजि राजीव ठकरेले

गोंदिया,दि.21– चंडीगड महानगरपालिका महापौरच्या निवडणुकीत काँग्रेस व आम आदमी पक्ष गटबंधनचे बहुमत असुन सुद्धा आपल्या सत्तेच्या जोरावर व संविधानाचा अपमान करून निवडणूक अधिकारीवर दबाव टाकून जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या मतांना अवैध ठरवून कमी मत असून सुद्धा भाजपने आपला महापौर निवडून आणला होता.या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस व आम आदमी पार्टीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.त्यावर सुप्रीम कोर्टाने भाजपच्या मतदान चोरी करणाऱ्या व संविधानाच्या उल्लंघन करणाऱ्या भूमिकेचा पर्दाफाश करून भाजप व निवडणूक अधिकारी यांना जोरदार चपराक देत पुुर्नमोजणी न्यायालयात करुन काँग्रेस व आम आदमी पक्ष गठबंधनचा महापौर विजयी झाल्याचा निर्णय दिल्याने आज काँग्रेसच्यावतीने सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करण्यात आले.येथील भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण करून संविधान सुप्रीम कोर्टाच्या माध्यमाने जिवंत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत देशाचा चौकीदार वोट चोर अशा घोषणा काँग्रेसच्यावतीने देण्यात आल्या.याावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजि.राजीव ठकरेले,माजी प्रदेश सचिव विनोद जैन, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राणे, संचालक अरुण गजभिये, जहीर अहमद, सूर्यप्रकाश भगत, अनिता मुनेश्वर, रेखा सहारे, चित्रा लोखंडे, रणजीत गणवीर, सिद्धार्थ गणवीर, लोकनायक राहांगडाले, आनंद लांजेवार, आलोक मोहंती, काशीफ अहमद, मनोज पटले, आकाश उके, सोमेश्वर ठकरेले, नामदेव वैद्य, जितेंद्र लिल्हारे इत्यादि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होतें.

Exit mobile version