काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण भाजपात

0
31

गोरेगाव,दि.23-  लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशातच पक्ष बदलाचे वारे ही सुरू झाले आहेत. त्यातच तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष,बाजार समितीचे माजी संचालक व विद्यमान गोरेगाव तालुका खरेदी विक्री संस्थेचे संचालक अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज गोरेगाव येथील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, तालुका अध्यक्ष संजय बारेवार, जि.प. सदस्य लक्ष्मण भगत, कृउबास सभापती गिरधारी बघेले, योगेश पटले आदींच्या उपस्थितीत अ‍ॅड. चव्हाण यांनी पक्ष प्रवेश केला. काँग्रेस पक्षात होणार्‍या घडामोडी तसेच जिल्हाध्यक्षांचे संघटना बळकटीकडे झालेले दुर्लक्ष तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होणारी गळचेपी आदी कारणांना घेवून काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून अ‍ॅड. चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्याचे वृत्त आहे.