सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचे काँग्रेसला समर्थन

0
35

नवी दिल्ली,दि.०६ः महाराष्ट्रातील सागंली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी आज ६ जून रोजी नवी दिल्ली येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांची भेट घेत काँग्रेस पक्षाला समर्थन पत्र दिले.यावेळी काँग्रेस नेते विश्वजित कदम हे सुध्दा उपस्थित होते.

विशाल पाटील यांनी काँग्रेस नेत्या सोनीया गांधी व राहुल गांधी यांची सुध्दा भेट घेत चर्चा केली तसेच इंडिया आघाडीसोबत असल्याची ग्वाही दिली.