गोंदियाचे जावई शिवराजसिंह चव्हाणांनी घेतली केंद्रीय मंंत्री पदाची शपथ

0
105

गोंदिया,दि.०९-गोंंदियाचे जावई असलेले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व विदिशाचे खासदार शिवराजसिंह चव्हाण यांनी आज दि.०९ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.चव्हाण यांनी केंद्रीयमंत्री पदाची शपथ घेताच सासूरवाडी असेलल्या गोंदियाच्या गोरेलाल चौकात फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली.


पूर्व विदर्भातील गोंदिया हा जिल्हा केवळ वनराईनेच नटलेला नाही तर त्याला एक वेगळे राजकीय वलयही लाभले आहे.मध्यप्रदेशमध्ये १८ वर्षे एक हाती सत्ता राखणारे शिवराज सिंह चौहान गोंदियाचे जावई होत.गोंदियातील मसानी कटुंबाचे जावई असलेले शिवराज सिंह यांच्या पत्नी साधना यांचे गोरेलाल चौकात माहेरघर. २००५ पासून शिवराजसिंह यांची मुख्यमंत्रिपदी निवड वा शपथविधी होत असताना त्यांच्या सासरी गोरेलाल चौक ते दुर्गा चौक या परिसरात फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात कुटुंबीयांचे नृत्य, आप्तस्वकियांकडून मिठाईचे वितरण, आदी जल्लोष साजरा केला जायचे.पण २०२३ मध्ये मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मात्र निराशा पसरली होती.त्यानंतर आता परत आज केंद्रीय मंत्री मंडळात चव्हाण यांचा समावेश झाल्याने उत्साह दिसून आला.