नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ

0
43

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा शपथ घेत मोदींनी हॅटट्रीक साधली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली आहे. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशाभरातील खासदार आणि बॉलिवडू सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पीएम मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती, त्यानंतर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.


पीएम मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी,शिवराजसिंह चव्हा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गृहखाते होते. तर नितीन गडकरी भूपृष्ठ आणि रस्ते वाहतूक मंत्रिपदाचा पदभार सांभाळत होते. यापूर्वी 10 वर्षे त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला आहे. गृथ आणि अर्थ खाते कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नाम रैंक मंत्रालय
राजनाथ सिंह कैबिनेट मंत्री
अमित शाह कैबिनेट मंत्री
नितिन गड़करी कैबिनेट मंत्री
जेपी नड्डा कैबिनेट मंत्री
शिवराज सिंह चौहान कैबिनेट मंत्री
निर्मला सीतारमण कैबिनेट मंत्री
मनोहर लाल खट्टर कैबिनेट मंत्री
एस जयशंकर कैबिनेट मंत्री
एचडी कुमारस्‍वामी कैबिनेट मंत्री
पीयूष गोयल कैबिनेट मंत्री
धर्मेंद्र प्रधान कैबिनेट मंत्री
जीतनराम मांझी कैबिनेट मंत्री
सर्वानंद सोनोवाल कैबिनेट मंत्री
राजीव रंजन ललन सिंह कैबिनेट मंत्री
राम मोहन नायडू कैबिनेट मंत्री
प्रह्लाद जोशी कैबिनेट मंत्री
जुरल ओरांव कैबिनेट मंत्री
गिरिराज सिंह कैबिनेट मंत्री
अश्विनी वैष्णव कैबिनेट मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया कैबिनेट मंत्री
गजेंद्र सिंह शेखावत कैबिनेट मंत्री