माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपला ‘रामराम’

0
244

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रमेश कुथे यांनी आज शुक्रवारी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे. रमेश कुथे हे शिवसेनेकडून १९९५ आणि १९९९ असे दोनदा निवडून आले आहेत.

१९९५ मध्ये त्यांनी गोंदिया विधानसभा या काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस चे तत्कालीन विद्यमान आमदार हरिहरभाई पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुक एकत्रित झाली असताना त्यांनी काँग्रेसचे अजितकुमार जैन यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्या कडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर रमेश कुथे यांनी २०१४ मध्ये शिवसेना सोडून नितीन गडकरी यांच्या उपस्थतीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा पासून ते भाजप पक्षात ज्येष्ठ नेते म्हणून मिरवत होते.