गोंदिया विधानसभा मतदारसंघात बहुजन ओबीसी उमेदवार द्या-भाजप नेत्यांची मागणी

0
312
गोंदिया,दि.११ – विधानसभा  निवडणुकीचे वारे संपूर्ण राज्यात वाहत असताना आता गोंदिया विधानसभा क्षेत्रातही नवनवीन घडामोडी घडत आहेत.९ सप्टेबंरला गोंदिया विधानसभा मतदारसंंघाचा आढावा घेण्याकरीता आलेले निरिक्षक नरोत्तम मिश्रा,गौरीशंकर बिसेन,आशिष वांदिले यांच्या समोर गोंदियातील भाजप नेत्यांनी निवेदन सादर करीत गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपने आजपर्यंंत बहुजन ओबीसी समाजाला उमेदवारी दिली नसल्याने यावेळी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.निवेदन देणार्यामध्ये माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,माजी जि.प.सदस्य सीए राजेश चतूर,जिल्हा परिषद अध्यक्ष पकंज रहागंडाले,जिल्हा परिषद सभापती संंजय टेंभरे व भाजप महामंंत्री मनोज मेंढे यांचासह अनेकांंचा समावेश आहे.भाजपने कुठल्याही नेत्यांला पक्षात घेऊन तिकिट देण्याएैवजी पक्षातीलच बहुजन ओबीसी नेत्यांना उमेदवारी द्यावी अशी अट घातली आहे.