तिरोडा:- ०९ सप्टेंबर सोमवारला मध्यरात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस आल्याने मोठया प्रमाणात नदी नाल्यांना पूर येवून पुराचे पाणी शेतक-यांच्या शेतात साचले असल्याने उभ्या धानपिकाचे नुकसान झाले तसेच कित्येक जागी घरेसुद्धा पडली याची दखल घेत आमदार महोदयांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्राद्वारे तातडीने पंचनामे करण्याबाबत निर्देश दिले जेणेकरून नुकसानग्रस्त शेतक-याना नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळण्यास मदत होईल तसेच घाटकुरोडा,चांदोरी खुर्द, किंडगीपार, महालगाव,धापेवाडा या गावी घटनास्थळी जावून मौका तपासणी केली या पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, प्र.तहसिलदार अजय संकुदरवार,तालुका कृषी अधिकारी गेंदलाल उके,प्र.गटविकास अधिकारी शितेश पटले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले,जि.प.सदस्य चत्रभुज बिसेन,विजय उईके, प.स.उपसभापती हुपराज जमाईवर,प.स.सदस्य चेतलाल भगत,मा.उपसभापती ब्रिजलाल रहांगडाले व संबंधित गावातील सरपंच व शेतकरी व तलाठी उपस्थित होते.
आमदार विजय रहांगडाले यांनी पुरग्रस्त गावाची पाहणी करून पंचनाम्याचे दिले निर्देश
वाढदिवसाच्या शुभेच्छा