अर्जुनी व मोगर्रा येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बूथ कमिटीची बैठक

0
102

गोंदिया,दि.०६ः-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने तालुक्यातील अर्जुनी व मोगर्रा येथे खा.प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात बूथ कमेटी महिला पदाधिकारी व सदस्यांची बैठक जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ,पंचायत समिती सदस्या सरला चिखलोंडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.या बैठकीत राज्यसरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

महायुती सरकारने लाडली बहीण योजना अंमलात आणून महिलांच्या स्वावलंबन, आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. माननीय अजितदादा यांनी केलेला वादा पूर्ण करून माहे- आक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे भाऊबीज ओवाळणीचे पैसे सुद्धा खात्यात जमा होत आहेत. परंतु विरोधक याला विरोध करीत असून महिलांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे. महायुती सरकारने महिलांना व मुलींना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे. त्याबद्दल महायुती सरकार व खा. श्री प्रफुल पटेलजी यांचे आभारी आहोत असे प्रतिपादन समाजकल्याण सभापती सौ पूजा अखिलेश सेठ यांनी केले. तालुक्यात पक्ष वाढीकरिता प्रत्येक बूथवर महिलांचे संघटन वाढविणे तसेच पक्षात जास्तीत जास्त महिलांचा सक्रियतेने सहभाग व संघटनेत महिलांची सदस्यांची संख्या वाढविण्यावर आपल्याला क्रियाशीलपणे कार्य करावे लागेल असे पंचायत समिती सदस्या सौ.सरला चिखलोंडे यांनी मत व्यक्त केले.

बैठकीला राखी रंधाये, मनीशा रंधाये, आशा रंधाये, योगिता मेश्राम, संगीता मेश्राम, प्रमिला मेश्राम, सुकवार रंधाये, फुलवंता रंधाये, कविता राऊत, जयवंता राऊत, रामलीला चौधरी, गीता साऊसाकडे, कांता घोरमारे, सुलेखा उपवंशी, मीना नागपुरे, भूमेश्वरी नागपुरे, ललिता रंधाये, देवला रंधाये, खेळणं रंधाये, कलावंती घोडमारे, उर्मिला मेश्राम, सरिता राऊत, चंद्रकला राऊत, सुंदर राऊत, जयवंता राऊत, पंचफुला राऊत, प्रमिला मेश्राम, रेणुका बिरनवार, कल्पना घोरमारे, वच्छला घोरमारे, सोनीबाई मेश्राम, मालती चौधरी, उर्मिला घोरमारे, जरामत घोरमारे, रमण पारेवार, अरुणा पारेवार, भूमेश्वरी उपवंशी, निर्मला नागपुरे, गंगोत्री गौतम, शारदा बिसेन, रुमनबाई, रीना हरिणखेडे, चिंतनबाई टेम्भरे, रूणीता चौहान, रोशनी गौतम, सुरेखा गौतम, छाया गौतम, सरला पटले, रेखाताई बोपचे, रीना पटले, गुणवंती खैरवार, लक्ष्मी खैरवार, माया पटले, शिशुकला पटले, ललिता खैरवार, अनिता गौतम, शकुंतला बिसेन, अनिता हरिणखेडे, कांतन गौतम, गुणनबाई गौतम, मनीषा पटले, ज्योती पटले, निलवंता पटले, पुष्पा पटले, सुषमा पटले, रेखा तूरकर, जयवंता गौतम, शंभू पटले, देबीलाल पटले, हेमराज पटले, नारायण पटले, विजय रहांगडाले, शंकर पटले, कोमल नंदगावली, तेजलाल गौतम, प्रेमलाल चौधरी कन्हय्यालाल पटले, देबिलाल गौतम, अंकेष हरिणखेडे, डुलेंड गौतम, हितेश पटले संजय भगत, चंद्रशेखर रहांगडाले, भजेंद्र तूरकर, अनिल पटले, घनश्याम पटले, देवेंद्र पटले, निर्मला पटले, भागरता केवट, ललिता रहांगडाले सहित मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ता उपस्थित होते.