38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ बोदलकसा जलाशयात पर्यंटकांकरीता बोटींगची सुविधा सुरु

बोदलकसा जलाशयात पर्यंटकांकरीता बोटींगची सुविधा सुरु

0
633

blank

पर्यटन विकासासाठी कटीबद्ध – आ. विजय रहांगडाले
गोंदिया:- तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्रांतर्गत तिरोडा तालुक्यात बोदलकसा येथे इंग्रजकालीन तलाव असून सदर तलाव नागझिरा पर्यटन क्षेत्राशी लागून असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.पर्यटकांची जलाशयात बोटिंग सुरु करण्यात यावी अशी अनेक दिवसाची मागणी होती,त्या मागणीला सकारात्मक घेत आमदार विजय रहागंडाले यांनी १५ कोटीच्या पर्यटन निधीतून बोटींग उपलब्ध करुन देत या सेवेचा आज ६ आँक्टोंबरला शुभारंभ केला.
बोदलकसा पर्यटनस्थळाच्या विकासाच्या अनुषंगाने सन २०१६ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह बांधकामाकरिता २.५०  कोटी मंजूर करुन भव्य बांधकाम पूर्ण झाले आहे.या तलावामध्ये बोटिंगची सुविधा उपलब्ध करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे बोदलकसा जलाशयात बोटिंगची सुविधा शासनातर्फे मंजूर करण्यात आली असून सदर बोटिंगचे उदघाटन आमदार रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रामुख्याने कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले,  सरपंच चैतलाल पटले, जि.प.सदस्य पवन पटले, माधुरी रहांगडाले, रजनी कुंभरे, जिल्हा महामंत्री मदन पटले, कृउबास संचालक मिलिंद कुंभरे, सोशल मिडिया प्रमुख संजय पारधी,किसान आघाडी तालुकाध्यक्ष नितीन पारधी , उमेश पटले,वनप्रीक्षेत्राधिकारी आर. जे. मून, गोरेगाव तहसिलदार व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.