
* भाजप व काँग्रेसच्या सवर्ण उमेदवारांविरोधात बहुजन चेहरा राहणार निवडणुकीच्या रिंगणात
गोंदिया – जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा ही “हॉट सीट” ठरत आहे. भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांचे जवळपास कन्फर्म तिकीट झाले असल्याने निवडणुकीच्या रिंगणात निश्चितच अपक्ष म्हणून बहुजन चेहरा राहणार असल्याने अपक्षामुळे कुणाचे गणित बिघडणार? असा प्रश्न सामान्य मतदाराला पडला आहे.
गोंदिया विधानसभेला यावेळी काँग्रेस व भाजपकडून बहुजन उमेदवार राहणार असे सांगण्यात येत होते. मात्र जस जशी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून या दोन्ही पक्षात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या सवर्ण उमेदवारांनी “घर वापसी” करीत बहुजनांच्या कार्यावर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध बहुजन संघटनांच्या मागणीनुरूप या क्षेत्रात बहुजन उमेदवार देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याने बहुजन उमेदवारासाठी अनुकूल वातावरण तयार असल्याचे जाणवत आहे.