
नागपूर : विरोधकांच्या महाविकास आघाडीत (मविआ) जागा वाटपाचे त्रांगडे निर्माण झाले असून छोट्या पाच पक्षांनी आपल्या वाट्यास न आलेल्या मतदारसंघांतही उमेदवारी दाखल केली आहे. उद्यापर्यंत आमच्या जागा सुटल्या नाहीत तर मैत्रीपूर्ण लढतीचा किंवा बंडखोरीचा पर्याय आमच्यासमोर असल्याचे सांगत या छोट्या पक्षांनी ‘मविआ’मध्ये बंडाचा झेंडा फडकवला आहे. नागपुरातही या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करत असून बंडाच्या तयारीत आहेत.
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
काँग्रेस नेते, माजी मंत्री अनीस अहमद यांनी उमेदवारी वाटपावरून स्वपक्षावर टीका केली आहे. पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये एकाच समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देत दुसऱ्या समाजाला डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी बंडाचा इशारा दिला आहे. अहमद वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती अहमद यांनी दिली.