मुंबई,दि.०५- महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी अजित पवार आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणार अजित पवार हे एकमेव नेते आहेत. अर्थमंत्री, ऊर्जामंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम करण्याचा अजित पवार यांना अनुभव आहे. नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२ या दरम्यान अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ ते सप्टेंबर २०१४ उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवार यांचा दुसरा कार्यकाळ होता. तर २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ हा उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवारांचा तिसरा कार्यकाळ होता. यासह डिसेंबर २०१९ ते जून २०२२ उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवारांचा चौथा कार्यकाळ होता. जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२४ उपमुख्यमंत्रिपदाचा अजित पवार यांचा पाचवा कार्यकाळ तर आज पाच डिसेंबर रोजी अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
विधानसभा सदस्य : इ.स.१९९१
१९९५ ते इ.स. १९९९, इ.स. १९९९ ते इ.स. २००४, इ.स. २००४ ते इ.स. २००९, इ.स. २००९ ते २०१४ , इ.स २०१४.ते २०१९ , इ.स २०१९ ते २०२४ ,
राज्यमंत्री : कृषी, फलोत्पादन आणि उर्जा – इ.स. १९९१ ते नोव्हेंबर इ.स. १९९२.
राज्यमंत्री : जलसंधारण, ऊर्जा व नियोजन – नोव्हेंबर, इ.स. १९९२ ते फेब्रुवारी, इ.स. १९९३.
मंत्री – पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन – ऑक्टोबर इ.स. १९९९ ते जुलै इ.स.२००४.
मंत्री – ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे) – इ.स. जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४.
मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता – नोव्हेंबर, इ.स. २००४ ते नोव्हेंबर, इ.स. २००९.
मंत्री – जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा – नोव्हेंबर, इ.स. २००९ ते नोव्हेंबर, इ.स. २०१०.
उप मुख्यमंत्री,(वित्त व नियोजन, ऊर्जा) – नोव्हेंबर, इ.स. २०१० ते सप्टेंबर इ.स.२०१२.
उप मुख्यमंत्री(वित्त व नियोजन, ऊर्जा) – डिसेंबर इ.स. २०१२ ते इ.स. सप्टेंबर २०१४.[ संदर्भ हवा ]
उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य) – इ.स. २०१९ ते इ.स. २०१९.(२ दिवसाचे)
उप मुख्यमंत्री(महाराष्ट्र राज्य ) – जुलै इ.स. २०२३.
अजित पवार त्यानंतर १९९५, १९९९, २००४, २००९, आणि २०१४ , २०१९, असे सलग सहा वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
१९९५ साली महाराष्ट्रात (भाजप+शिवसेना) या युतीचे सरकार आले. त्यानंतर १९९९ साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.
महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. ऑक्टोंबर १९९९ ते डिसेंबर २००३ पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते. डिसेंबर २००३ ते ऑक्टोंबर २००४ या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
२००४ साली आघाडी सरकार (कॉंग्रस + राष्ट्रवादी काँग्रेस + इतर) पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते अजित पवारांकडेच होते. २००४ साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अर्थिक घोटाळ्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. सक्त वसुली संचालनालय (Enforcement Directorate) या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करणार त्यापूर्वीच अजित पवार यांनी २७ सप्टेंबर २०१९ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला.