जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं

0
49

राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मुंबई:-महाराष्ट्राच्या आजचा दिवस मैलाचा दगड ठरला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत.वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेत मराठी एकतेचा विजय साजरा होत आहे.त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीविरोधात ठाकरे बंधूंनी एकजुटीने आवाज उठवला, आणि त्यांच्या दबावामुळे महायुती सरकारने हा निर्णय रद्द केला. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण यातून नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांना टोला लगावला.

त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध

*मराठी भाषेच्या रक्षणासाठी ठाकरे बंधूंनी त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध केला होता. या सूत्रानुसार, शाळांमध्ये मराठीसह हिंदी आणि इंग्रजीच्या सक्तीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

राज ठाकरे यांनीही सरकारला कडक इशारा दिला, “तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, पण आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर!” या एकजुटीमुळे महायुती सरकारला माघार घ्यावी लागली, आणि त्रिभाषा सूत्राचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला. ही घटना मराठी भाषिकांसाठी मोठा विजय मानली जात आहे.

राजकीय पक्षाचा झेंडा नाही

वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित विजय सभेचा मुख्य उद्देश मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव करणे हा आहे. या सभेला कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, फक्त मराठी हाच अजेंडा असेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. “कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगत त्यांनी मराठी एकतेचा संदेश दिला.

कोणत्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आम्ही २० वर्षांनी कोणत्याही व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननिय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचं ते फडणवीसांना जमलं, असा टोला राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.