25.9 C
Gondiā
Monday, September 7, 2026
Home राजकीय अर्जुनी मोरगावला ‘राष्ट्रवादी’चा भव्य कार्यकर्ता मेळावा व धडक मोर्चा; विविध न्याय्य मागण्यांसाठी...

अर्जुनी मोरगावला ‘राष्ट्रवादी’चा भव्य कार्यकर्ता मेळावा व धडक मोर्चा; विविध न्याय्य मागण्यांसाठी उद्या तहसीलदारांना देणार निवेदन

0
0

अर्जुनी मोरगाव ):शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, धानाला बोनस, २४ तास वीज पुरवठा, पेपरफुटीवर रोख, महागाई आणि स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आक्रमक झाली आहे. या विविध ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी उद्या, ८ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी १०:०० वाजता अर्जुनी मोरगाव येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यानंतर सकाळी ११:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.आमदार रोहितदादा पवार (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श.प.) यांच्या प्रमुख नेतृत्वात हा मेळावा व मोर्चा पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटकपदी प्रदेश उपाध्यक्ष सुनीलभाऊ भुसारा उपस्थित राहतील.

या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून नागपूर जिल्हाध्यक्ष सलिलदादा देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार, भंडारा जिल्हाध्यक्ष आमदार चरण वाघमारे, गोंदिया जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे, कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरचे सभापती यशवंत परशुरामकर तसेच गोंदिया महिला जिल्हाध्यक्ष मेघा बिसेन उपस्थित राहणार आहेत.

आंदोलनातील मुख्य मागण्या:शेतकरी हित: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, धान उत्पादक शेतकऱ्यांस योग्य भावासह बोनस मिळावा, २४ तास वीज पुरवठा उपलब्ध करावा आणि नियमित कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांची प्रोत्साहन राशी तत्काळ मिळावी.

  • जनहित व रोजगार: लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांना हक्काचा लाभ मिळावा, बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळून पेपरफुटी पूर्णपणे थांबावी.

  • प्रशासकीय पारदर्शकता: महागाईवर नियंत्रण मिळवावे, जनतेवर लादण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला पूर्ण विरोध व्हावा, संजय गांधी योजनेतील BPL ची अट रद्द करावी आणि DCS ई-पीक पाहणी नोंद सहाय्यकाऐवजी जुन्याच पद्धतीने करण्यात यावी.

या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे व मोर्चाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी/मोर. च्या वतीने करण्यात आले असून, स्वागताध्यक्ष गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.