पनवेल महापालिका निकाल, भाजपला स्पष्ट बहुमत

0
9

नवी मुंबई,दि.26: पनवेल महापालिकेत भाजपने मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.  भाजपने  एकूण 78 पैकी 51 जागांवर आघाडी मिळवत बहुमताचा 40 चा आकडा पार केला आहे.दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीने केवळ 25 जागांपर्यंतच मजल मारली आहे. तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला एकही जागा मिळाली नाही.