मागण्या मान्य न झाल्याने शिवसैनिकांचा रास्तारोको

0
19

धुळे, दि. 3 – प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी शेतक-यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शेतक-यांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्याने शेतकरी संप मिटला आहे. संप मागे घेण्यात आला असला तरीही शनिवारी धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी शुकशुकाटच होता.  बाजार समितीत शनिवारी मक्याची 40 पोतेच आवक झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरख पाटील यांनी दिली़.

शासनाने शेतक-यांच्या सर्व मागण्या पूर्ण न केल्यामुळे शिवसेनेच्या धुळे महानगर शाखेतर्फे शनिवारी दुपारी 12 वाजता चाळीसगाव रोड चौफुलीवर ‘रास्ता-रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे, साक्री दोंडाईचा येथील बाजार समितींसह  पिंपळनेर उपबाजार समितीच्या आवारात शेतकरी फिरकलेच नाही़. शेतक-यांनी भाजीपाल्यासह कांदे आणि दूध रस्त्यावर फेकत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. तर बाजार समितीत हमाल केवळ हमालांची हजेरी आहे.