Home राजकीय सरकारच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सरकारच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीचा हल्लाबोल

0

औरंगाबाद,दि.27: विविध क्षेत्रात कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर स्थिती शासनाने निर्माण स्थिती केली आहे. शासनाच्या या अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी आज (सोमवार) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.क्रांती चौक येथून नियोजित वेळेच्या दोन तास उशिरा म्हणजे १ वाजता या मोर्चाला सुरवात झाली. सरकार विरोधी घोषणाबाजी करीत मोर्चा पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, चेलीपुरा मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहचला.  आपल्या मागण्यांचे विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन दिले.यावेळी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, काशीनाथ कोकाटे, रंगनाथ काळे, किशोर पाटील, शिवाजी बनकर, सुरजितसिंग खुंगर, मनमोहनसिंग ओबेराय, संजय वाघचौरे, अभिजित देशमुख, विनोद पाटील, मेहराज पटेल, अंकिता विधाते, छायाताई जंगले, दत्ता भांगे, गजानन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

या निवेदनात म्हटले, की गेल्या तीन वर्षापासून सत्तेवर असलेले भाजपा- शिवसेना सरकार सर्वच पातळ्यावर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ घोषणा देऊन त्यांनी जनतेची फसवणुक केली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, लहान व्यावयायिक, शिक्षक, डॉक्‍टर अशा सर्वच थरांमध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कर्जमाफी योजनेतर्गंत सर्व शेतकऱ्यांना सर्व प्रकारची सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, शेतकरी विरोधी व्यापक धोरणांमुळे गेल्या तीन वर्षात एकाही पिकाला हमीभाव एवढा बाजारभाव मिळू शकला नाही. तत्काळ उत्पादन खर्च अधिक 50 टक्‍के नफा असे हमीभावाचे धोरण जाहीर करावे. गुजरात राज्याच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर पाचशे रुपये प्रति क्‍विंटल बोनस द्यावा, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग रोजगारात झालेली घसरण, नागरी भागातील समस्या, आश्‍वासनाची पुर्तता, शिष्यवृत्तीचे प्रश्‍न, आरोग्याचे प्रश्‍न, आरक्षण, कुपोषण, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, अशा  अनेक विषयाचा समावेश आहे.

 

Exit mobile version