Home विदर्भ २९ व ३० नोव्हेंबर गोंदिया ग्रंथोत्सवाचे आयोजन

२९ व ३० नोव्हेंबर गोंदिया ग्रंथोत्सवाचे आयोजन

0

गोंदिया,दि.२७ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने २९ व ३० नोव्हेंबर दरम्यान श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सभागृहात गोंदिया ग्रंथोत्सव-२०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळून ग्रंथदिंडीचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, तहसिलदार रविंद्र चव्हाण, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम यांच्या हस्ते होईल. ही दिंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-नेहरु चौक-गोरेलाल चौक-गांधी प्रतिमा चौकातून शारदा वाचनालयात पोहोचेल.
सकाळी ११ वाजता पालकमंत्री राजकुमार बडोले हे ग्रंथोत्सवाचे उदघाटन करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे हया असतील. प्रमुख अतिथी म्हणून खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, नागो गाणार, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, सहायक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी २ ते ४ दरम्यान आयोजित डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व या विषयावर राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ.रमेश जनबंधू, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा.कविता राजाभोज, एन.एम.डी.कॉलेजचे प्रा.बबन मेश्राम हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे. दुपारच्या ४.३० ते सायंकाळी ६.३० वाजताच्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवकुमार शर्मा, युवराज गंगाराम, माणिक गेडाम, अशोक पारधी, अंजनाबाई खुणे, सुरेश बंजारा, शाहीद अंसारी शफक हे सहभागी होणार आहे.
३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ‘ग्रंथाने काय दिलेङ्क या परिसंवादात सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे, एम.बी.पटेल महाविद्यालय देवरीच्या प्रा.डॉ.वर्षा गंगणे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, कवी व साहित्यीक माणिक गेडाम सहभागी होणार आहे. दुपारी २ ते ४ वाजता दरम्यान आयोजित ‘स्पर्धा परीक्षा एक आव्हानङ्क या विषयावर जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे, स्टडी सर्कल शाखा गोंदियाचे संचालक श्याम मांडवेकर हे मार्गदर्शन करणार आहे.
दुपारी ४ वाजता समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ झाडीबोली साहित्यीक डॉ.हरिश्चंद्र बोरकर हे असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालीनी भूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, जि.प.उपमुख्य कार्यकारी(महिला व बालकल्याण), महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांची उपस्थिती राहणार आहे.
२९ व ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. विविध प्रकाशनाचे स्टॉल, तसेच शासकीय ग्रंथागार व मुद्रणालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य स्टॉल या ग्रंथोत्सवात राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला वाचकांनी, विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांनी केले आहे.

Exit mobile version