मंत्रिमंडळालाच समुपदेशनाची गरज – नवाब मलिक

0
6

मुंबई दि.15- राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. बळिराजाची परिस्थिती हलाखीची झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. शेतमालाचे हमीभाव वाढले पाहिजेत, हे करायचे टाळून राज्य मंत्रिमंडळातील सदस्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचे समुपदेशन करायला निघाले आहे. खरेतर राज्याच्या मंत्रिमंडळालाच समुपदेशनाची गरज असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केली आहे.

मलिक म्हणाले की गारपीट, अवकाळी यांनी राज्यातील शेतकरी खचून गेला आहे, त्यामुळे कधी नव्हे इतके शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे असताना शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून या मंत्रिमंडळातील मंत्री समुपदेशनाची भाषा करीत आहेत. अवघ्या मंत्रिमंडळालाच मानसिक उपचाराची गरज असल्याचा टोलाही मलिक यांनी हाणला. केंद्र आणि राज्य येथे एकाच पक्षाचे सरकार आहे, तरीही केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय नाही. गारपिटीच्या केंद्राच्या मदतीबाबत राज्य सरकार अत्यंत उदासीन आहे, असाही आरोप मलिक यांनी या वेळी केला