काँग्रेसचे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात धरणे

0
277

भंडारा,दि.02ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगासह देश होरपळून निघाला आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी नवे संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. धरणे आंदोलनानंतर भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई व महासचिव गौरीशंकर मोटघरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याकरिता निवेदन पाठविण्यात आले. यावेळी प्रमोद तितिरमारे, सीमा भुरे, प्रकाश पचारे, महेंद्र निंबार्ते, अनीक जमा पटेल, अजय गडकरी, प्यारेलाल वाघमारे, शंकरराव तेलमासरे, होमराज कापगते, शंकर राऊत, मनोहरराव उरकूडकर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, धनराज साठवणे, प्रेम वनवे, सचिन घनमारे, शमीम शेख, जयश्री बोरकर आदी उपस्थित होते.