42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home क्रीडा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कारांच्या सुधारित नियमावलीकरिता सुचना, अभिप्राय पाठवावेत

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कारांच्या सुधारित नियमावलीकरिता सुचना, अभिप्राय पाठवावेत

0
50

वाशिम, दि. १४ : शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णय २४ जानेवारी २०२० नुसार निर्गमित केलेले आहे. यामध्ये नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय २२ जानेवारी २०२१ पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना/अभिप्राय dsysdesk14@gmail.com किंवा [email protected] मेलवर २२ जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

blank