36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा मोहाडी चा सुपुत्र “बंगाल वारियर्स” कबड्डी संघात

मोहाडी चा सुपुत्र “बंगाल वारियर्स” कबड्डी संघात

0
150

blank

– आ.डॉ.परिणय फुके यांनी केले अभिनंदन

भंडारा-जिल्ह्यातील मोहाडी शहरातील एका सामान्य घरातील आकाश पिकलमुंडे या तरुणाने कबड्डी या खेळात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. कबड्डी या खेळात “विदर्भ एक्स्प्रेस” म्हणून ओळखला जाणारा आकाश आता प्रो.कबड्डी या खेळामध्ये “बंगाल वॉरियर्स” कडून प्रतिनिधित्व करणार आहे. त्याबाबत १ सप्टेंबर रोजी आमदार डॉ परिणय फुके यांनी आकाश पिकलमुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्याला मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष प्रदीपजी पडोळे, मुन्ना पुंडे, प्रा.हेमंत देशमुख, तिलक वैद्य, रुबी चढा, संजय कुंभलकर, निशिकांत ईलमे, सूर्यकांत ईलमे, संतोष वहिले, दिनेश निमकर, हितेंद्र पौणिकर, रांजण ढोमणे, शैलेश गभने, महेंद्र गभने, मंगेश पारधी, होमेश्वर नंदनवार, नारायण निखारे, विजेश निमकर, अंकित निमकर, दयाराम मोटघरे, संतोष डोंगरे, डुंभरे सर, उमेश गभने, राहुल सेलोकर, मीनल जिभकाटे, यशवंत बालपांडे, सिद्धेश मांढरे, अरविंद पटले, उपस्थित होते.

blank