Home क्रीडा जलतरणपटू जयंत दुबळेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी भरारी

जलतरणपटू जयंत दुबळेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी भरारी

0

नागपूर,दि.21-येथील १३ वर्षांचा जलतरणपटू जयंत दुबळे हा मुंबई आणि गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर १० दिवसांत विविध टप्प्यात १२५ सागरी जलतरण करणार आहे. हे अंतर जवळपास ३० तासांत पोहून नवा ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया बुक रेकॉर्ड’ नोंदविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
जयंत दुबळे हा अमरावतीचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांचा मुलगा आहे. शालेयस्तरावर जलतरणात चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याने लांब पल्ल्याच्या जलतरणात अनेकदा पेस स्वीमर म्हणून भूमिका बजावली आहे. 

२५ डिसेंबरला जयंत गेट वे ऑफ इंडिया ते राजभवन, २६ ला राजभवन ते वरळी सी लिंक, २७ ला वरळी सी लिंक ते जुहू चौपाटी, २८ ला जुहू चौपाटी ते वरळी सी लिंक, २९ ला वरळी सी लिंक ते राजभवन व ३० ला राजभवन ते गेट वे ऑफ इंडिया असा ७५ कि.मी. पोहणार आहे. गोव्यात तो १५ जानेवारी रोजी डोनापावलो खाडी, १६ ला फोर्ट अँग्युवादा, १७ ला डोनापावलो तसेच १८ जानेवारीला पणजी फोर्ट ते डोनापावलो असे एकूण ५० किलो अंतर पोहणार आहे. जयंतच्या या मोहिमेत दोन बोटी राहणार आहेत. याशिवाय सुखदेव धुर्वे, अमोल वालसे, पुष्पक लांडे आणि अभिषेक लोहकरे हे चार पेस स्वीमर राहतील. मुंबई व गोव्यातील सुमद्रात अशाप्रकारे पोहून जाणारा जयंत हा त्याच्या वयोगटात पहिलाच जलतरणपटू राहणार असल्याची माहिती जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे सचिव डॉ. संभाजी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version