Home Top News मालवणीमधील 3 तरूण इसिसमध्‍ये गेल्‍याचा संशय

मालवणीमधील 3 तरूण इसिसमध्‍ये गेल्‍याचा संशय

0
वृत्तसंस्था
मुंबई,दि.21- मुंबईमधील मालवणी परिसरातील तीन तरूण मागील दोन महिन्‍यांपासून बेपत्‍ता आहेत. ते तिघेही इसिस या दहशवादी संघटनेत सहभागी झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून अशी शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे. एटीएसने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
किरकोळ कारण सांगून घराबाहेर पडलेले हे तरूण दोन महिने उलटले तरी परतले नाहीत. ते कुठे आहेत या बाबत पालकांना माहिती नाही. त्‍यांच्‍यासोबत दोन महिन्‍यात एकदाही संपर्क झाला नाही. या तिघांपैकी एका युवकाने यापूर्वीच देश सोडला अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली. त्‍यामुळे हे तिघेही तरूण इसिसमध्‍ये सहभागी झाले असावे, असा संशय व्‍यक्‍त केला जात आहे.

 

Exit mobile version