आमदार चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद््घाटन

0
19

सडक अर्जुनी-गोंदिया जिल्हा कबड्डी असोसिएशन व ललिताबाई बहुउद्देशिय सेवाभावी संस्था मोहगाव/तिल्ली च्या वतीने आयोजित आमदार चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा स्थानिक गोंडवाना मंडळाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. कबड्डी स्पर्धेचे उद््घाटन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात पार पडले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नपं सभापती अनिल राजगिरे, बांधकाम सभापती महेंद्र वंजारी, सभापती कामिनी कोवे, जिल्हा हौसी कबड्डी असोसिएशनचे सचिव एस.ए.वहाब, न.प.चे कर व प्रशासकीय अधिकारी निहाल नाईकवडी, सपोनि पांढरे, नगरसेविका दिक्षा भगत, माजी जि.प.सदस्य रमेश चुर्‍हे, पं.स.सदस्य डॉ.सुखीराम वाढई, तुलाराम चंद्रिकापुरे, इंजी.ओमेश कापगते आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कबड्डीच्या मैदानातील फित कापून स्पर्धेचे रितसर उद््घाटन करण्यात आले. खेळाच्या माध्यमातून गुणात्मक बदल घडवून आणून कुठल्याही खेळात स्वत:मधील गुणवत्ता सिध्द कशी करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असून नेतृत्व कौशल्य जर जमले तर देशपातळीवर कबड्डीचे नेतृत्व आपल्याला करता येईल, असे मनोगत आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचे पुष्प, वृक्ष व स्मृतिचिन्ह देवून स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून आमदार चषक कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.ए.वहाब यांनी तर संचालन आशिष येरणे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य क्रिडाप्रेमी व नागरिक उपस्थित होते.