Home क्रीडा जलतरणपटूंनो, जिल्ह्याचा नावलौकिक करा-पटोले

जलतरणपटूंनो, जिल्ह्याचा नावलौकिक करा-पटोले

0

साकोली दि.१२:: आरोग्याच्या दृष्टीने पोहण्याचा व्यायाम अत्यावश्यक मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा होत असतात. मात्र या स्पर्धांमध्ये भंडारा, गोंदिया जिल्हय़ातील स्पर्धक दिसत नाही. शिवणीबांध येथील जलाशयावर आयोजित खासदार जलतरण स्पध्रेच्या माध्यमातून भंडारा, गोंदिया जिल्हय़ातील जलतरणपटूंनी यशाचे शिखर गाठून जिल्हय़ाचा नावलौकीक करावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
शिवनीबांध जलतरण संघटनेच्या वतीने रविवारी साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील जलाशयावर खासदार जलतरण स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशीवार, अतिथी म्हणून राष्ट्रीय जलतरणपटू भोजराज मेo्राम, साहसी जलतरणपटू मनोहर मुळे, वैशाली चांदेवार, दिपक मेंढे, दिनेश गुप्ता, आयोजक अध्यक्ष राजेश बांते, सचिव मनिष कापगते, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. राजेश चंदवाणी, गिरिश रहांगडाले, जनार्धन दोनोडे आदी उपस्थित होते.

शिवनीबांध जलतरण संघटनेच्या वतीने रविवारी साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील जलाशयावर खासदार जलतरण स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. पुरुष, महिला तसेच अपंग पुरुष व महिला गटात स्पर्धा घेण्यात आली. यात १0 ते १४, १५ ते २५, २६ ते ४0, ४१ ते ५५, ५६ ते अर्मयाद असे पुरुष गट. तर महिला गटांसाठी १0 ते १७, १८ ते अर्मयाद. तसेच अपंग पुरुष व महिलांसाठी वयोगटाची अट नव्हती. स्पर्धा रविवारी सकाळपासूनच सुरु झाल्याने स्पर्धा बघण्यासाठी हौशी प्रेक्षकांनी शिवणीबांध जलाशयावर गर्दी केली होती.
ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील नागरिक पाहत असतात. मात्र प्रत्यक्षात शिवणीबांध येथे घेण्यात आलेल्या स्पर्धा बघण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली होती. तसेच स्पर्धेत २00 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा शांतता व सुव्यवस्थित पार पडली.

Exit mobile version